गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचे "परिवर्तन बाप्पा" :विधायक सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सव आयोजन : परिसरात मंडळाचे सर्वत्र कौतुक #ganpatibappa - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचे "परिवर्तन बाप्पा" :विधायक सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सव आयोजन : परिसरात मंडळाचे सर्वत्र कौतुक #ganpatibappa

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदुर: 

सध्या कोरोना संकटाने गणेश मंडळाना अनेक अटी- शर्थींचे पालन करावे लागत आहे. दरम्यान यावर्षी मंडप आकार कमी ठेवण्याचा प्रशासकीय सूचना असून मूर्तीचा आकार देखील ४ फुटापेक्षा अधिक ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरवर्षी नयनरम्य देखावे आणि सर्वाधिक उंचीची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या गडचांदुरचा राजा गणेश मंडळाने कोरोना विघ्नाच्या सावटात 'परिवर्तन बाप्पा' हा विधायक उपक्रम राबवत गणेश मंडळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 


गडचांदूरचा राजा गणेश मंडळाने प्रशासकिय नियमांचे काटेकोरपणे पालन करत विविध समाजपयोगी उपक्रम योजिले आहेत. यंदा गणेश मंडळांच्या नियोजनात बरेच परिवर्तन झाले आहे. तर, कोरोनाने मानवी जीवनपद्धतीत बरेच परिवर्तन होत आहे. या अनुषंगाने ' परिवर्तन बाप्पा ' या उपक्रमातून 'अवघी विघ्ने नेसी विलया' हा आशावाद गडचांदूरचा राजा गणेश मंडळ निर्माण करत आहे. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय किट्स वितरण, गडचांदूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा कोव्हिड योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव, परिसरातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स वितरण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व गरजूंना वर्षभर मोफत तपासणीचे आरोग्य कार्ड वाटप आदी कृतीयुक्त उपक्रमातून खऱ्या अर्थाने ' विघ्नहर्ता' असलेल्या बाप्पाचा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचे सचिव सुयोग कोंगरे यांनी सांगितले. 


तर, लोकसहभागातून गरजू घटकांना मदत करत यंदाच्या संकट काळात गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष अक्षय मेंढी यांनी केले.


दरम्यान परिवर्तन बाप्पा उपक्रमाचा शुभारंभ माणिकगड पहाडावरील पल्लेझरी व शेणगाव येथील गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय किट्स वितरित करून करण्यात आला. गडचांदूर येथील नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम, उपाध्यक्ष नगरपरिषद शरद जोगी, प्रतिष्ठित पत्रकार हबीब शेख, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, नगरसेवक विक्रम येरणे, नगरसेवक अरविंद मेश्राम, नगरसेवक राहुल उमरे आदींची उपस्थिती होती. 


गडचांदूरचा राजा गणेश मंडळाच्या माध्यमातून प्रशासकिय नियमांचे पालन करत यावर्षी ' परिवर्तन बाप्पा ' उपक्रम राबवून यापुढील काळात सकारात्मक बदल समाजजीवनात व्हावे अशी प्रार्थना करत असल्याचे गडचांदूरचा राजा गणेश मंडळाचे उपाध्यक्ष गणेश कवलकर, कोषाध्यक्ष भाविक कुळमेथे, प्रवीण सातभाई, कुणाल पारखी, मयुर पोटदुखे, दत्तात्रय बोढाले, अमित पारखी आदींने मांडले. 


दरम्यान गडचांदूरचा राजा गणेश मंडळा मार्फत राबविण्यात येत असलेल्या या विधायक ' परिवर्तन बाप्पा ' उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.