बाल गणेश उत्सव मंडळ , भगतसिंग चौक , नागभीड तर्फे भाविकांना सॅनिटायझर व मास्क वितरण : गणेश मंडळाची दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम #ganapati bappa - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाल गणेश उत्सव मंडळ , भगतसिंग चौक , नागभीड तर्फे भाविकांना सॅनिटायझर व मास्क वितरण : गणेश मंडळाची दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम #ganapati bappa

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर : नागभीड -

      


२५ वर्षाहुन अधिक कालावधीची परंपरा लाभलेल्या नागभीडच्या भगतसिंग चौक येथील बाल गणेश उत्सव मंडळाने आपल्या सामाजिक उपक्रमाची परंपरा अबाधित राखत कोरोना संकटकाळात भाविकांना सॅनिटायझर व मास्क चे वितरण केले. कोरोनामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचा काटेकोर पालन करीत अत्यंत साधेपणाने यावर्षी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

         

महाराष्ट्र शासनातर्फे दोन वर्षाआधी घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत चंद्रपुर जिल्ह्यातुन व नागभीड तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त करीत एक लक्ष पंचेविस हजार रुपयाचे बक्षिस मिळवित सुयशाचे मानकरी ठरले होते. पोलिस प्रशासनाकडुन या मंडळाला दरवर्षीच उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित केल्या जात आहे. दरवर्षी या मंडळाकडुन विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याने नागभीड परिसरात या मंडळाकडे नेहमीच भाविकांची ओढ असते. 

       

यावर्षी कोरोना संकटाचे भान लक्षात घेउन  मंडळाचे मार्गदर्शक चंद्रपुर जिल्हा परिषदेचे सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या सहकार्याने श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शन दिनाचे औचित्य साधुन मंडळातर्फे भाविकांना सॅनिटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गजपुरे व संस्थेचे उपाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्राचार्य देविदास चिलबुले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 


याप्रसंगी गणेश मंडळाचे अध्यक्ष शुभम अमृतकर , सचिव विनोद गिरडकर , अविनाश अमृतकर , विक्रांत गजपुरे,  दयाराम नन्नावरे, सुबोध नागोसे, चेतन चिलबुले , किशोर हजारे , राजकुमार मोहरकर व सदस्यांची उपस्थिती होती. मंडळाला भेट देणाऱ्या गणेशभक्तांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.