पोलिस जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद, दुसरा जखमी #gadchiroli - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पोलिस जवानांवर नक्षल्यांचा हल्ला, एक जवान शहीद, दुसरा जखमी #gadchiroli

Share This

खबरकट्टा / गडचिरोली : 

भामरागड उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या कोठी पोलिस मदत केंद्रातील पोलिस जवानांवर नक्षल्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झाला आहे तर दुसरा जवान जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 


दुशांत नंदेश्वर असे शहीद जवानाचे नाव असून दिनेश भोसले नामक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही जवान कोठी गावात किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. दरम्यान नक्षल्यांनी दोन्ही जवानांवर हल्ला केला. यामध्ये दुशांत नंदेश्वर हे शहीद झाले आहेत. अधिक वृत्त लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.