🔴 वैनगंगा नदी काठावरील गावात महापूर.
🔴 लाडज येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर.
🔴 प्रशासना कडून अकरा बोट मदतकार्यात.
खबरकट्टा / ब्रह्मपुरी:-
गोसीखुर्द धरणांचे ३२ दरवाजे खुले करण्यात आल्याने वैनगंगा नदीप्रात्रात अचानक पाण्याची पातळी वाढली. वैनगंगा नदीच्या काठावर अनेक गाव वसलेले आहेत.या गावांना प्रशासनाने अधिकृतपणे कोणत्याही प्रकारचे सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले नाही.
त्यामुळे लाडज, उदापूर पिंपळगाव अर्हेरनवरगाव बेलगाव,कोलारी, चिखलगाव, भालेश्वरसोन्द्री सुरबोडी कोथुळणा झिलबोडी,बेटाळा, बोरगाव,पारडगाव,किन्ही या गावात नदीच्या पाण्याने तांडव मांडले आहे. प्रशासनाने कोणत्याही सुचना न केल्याने पुरग्रस्ताना घरचे सामान काढता आले नाही.अनेकांच्या घरांत पाणी घुसून घर पडले असुन खूप नुकसान झाले आहे.
अनेक नागरिक आपले जीव वाचवण्यासाठी घरांच्या माथळ्यावर पाल ठोकुन वास्तव्यास आहेत.अनेकांचे अन्नधान्य पाण्यात वाहून गेले.आपला जीव वाचवा म्हनुन नागरिक प्रशासना कडे आशेने पाहत आहेत.लाडज हे गाव नदी भोवतीच्या मधील बेटावर वसलेले गाव आहे. या गावात पाणी घुसले असुन येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
काल पासुन प्रशासनाने काल व आज सुध्दा हेलीकॅप्टर व बारा बोट बोलवुन पुरग्रस्ताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे.काल लाडज येथील ७५ ते ८० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.आणि आज ३०० नागरिक स्थलांतर केले आहे.
अचानक आलेल्या या पाण्यामुळे अनेक हेक्टर जमीन नुसकान झाले व जनावरे मुत्युमुखी पडले. प्रशासना कडुन अजुनही मदतकार्य सुरू असून अनेक सेवाभावी संस्था व राजकीय नेते यांनी पुढे येऊन पुरग्रस्ताना भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
पुनर्वसन,आपत्ती मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल पुरग्रस्त गावांचा आढावा घेऊन भेटी दिल्या.प्रशासनाला पुरग्रस्ताना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यांचे आदेश दिले.संबधित गोसीखुर्द धरणांचे आयुक्तांशी चर्चा करून धरणांचे पाणी कमी करण्याचे आदेश दिले.
गोसीखुर्द धरणांचे दरवाजे काल पर्यंत ३०११७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो आज २६८३६ क्युसेक कमी करण्यात आले आहे.त्यामुळे आता पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता आहे. रेक्सु टिम च्या माध्यमातून अनेक पुरग्रस्ताना बाहेर काढण्यात आले. ब्रह्मपुरी पोलिस पुरग्रस्त ठिकाणी तळ ठोकुन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सुचना करत आहेत.
बोटीच्या सहाय्याने अनेक गावांतील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.काल परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक ब्रह्मपुरी मध्ये दाखल झाले.
अनेक शेतकऱ्यांचे हजारों हेक्टर जमीन नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरीत पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
🔴 ब्रह्मपुरी शहरातील मोरे व पर्वते गॅस गोडाऊन मध्ये पाणी घुसल्याने अनेक नागरिक दोन दिवसांपासून सिलेंडर साठी वाट बघत आहेत.
🔴 ब्रह्मपुरी शहरातील प्रभुकुपा राईस मिल, रामदेव बाबा साल्वंट,मॉं वैष्णोदेवी राईस मिल नदीचे पाणी घुसून लाखो रुपयांची नुकसान झाली आहे.
संबंधित पुरग्रस्त गावांचा दौरा केला असुन प्रशासनाला तातडीने पुरग्रस्ताना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहे.प्रशासनाकडुन मदतकार्य सुरू आहे.लाडज गावाची परिस्थिती पाहुन हेलीकॅप्टर व बोट बोलाविण्यात आले आहे.गोसिखुर्द धरणांच्या आयुक्तांशी चर्चा झाली असून पाण्यांची क्युसेक कमी करण्यासाठी सुचना केले आहे.विजय वडेट्टीवारपुनवर्सन ,आपत्ती तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा
काल पुरग्रस्त विभागाची पाहणी करून काल लाडज या गावातील ७५ ते ८० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.व आज ३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.प्रशासनाने एकुण मदतकार्यात बारा बोट बोलविले आहे.व आज गोसिखुर्द धरणांचे दरवाजे २८८३६ क्युसेक कमी करण्यात आले आहे.सौ.क्रांती डोंबेउपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी