ब्रेकिंग चंद्रपूर : पहिला कोरोना मृत्यू : रहमतनगर रहिवासी तरुणाचा कोरोनाने मृत्यू : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट #first corona dead case found at chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर : पहिला कोरोना मृत्यू : रहमतनगर रहिवासी तरुणाचा कोरोनाने मृत्यू : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट #first corona dead case found at chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्यास्थितीत 523 वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या वाढत आहे . त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात सध्या शेतीकामे सुरु आहे. त्यामुळे कधी रुग्ण सापडेल आणि लॉकडाऊन होतील, याचा सध्यातरी नेम नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 523 लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून 322 बाधित बरे झाले आहेत. सध्या 201 बाधितावर उपचार सुरू आहे.


आज 1 ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या बळी गेला. हा कोरोनाबाधित 2 दिवसआधी अमरावती जिल्ह्यातून चंद्रपूर मध्ये आला होता, ज्यावेळी तो आपल्या जिल्ह्यात दाखल झाला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै या 42 वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.

चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण 30 जुलैला रात्री अकरा तीस वाजता दाखल झाला होता. 30 जुलैला गंभीर अवस्थेत रात्री 11:30 वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.