'तबलिघी जमात' ठरली 'बळीचा बकरा', FIR रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश #SC ordered to quash FIR on Tablighi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

'तबलिघी जमात' ठरली 'बळीचा बकरा', FIR रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश #SC ordered to quash FIR on Tablighi

Share This

खबरकट्टा / राष्ट्रीय : नवी दिल्ली : 22 ऑगस्ट -

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिघी जमातच्या (Tablighi Jamaat) देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. करोना काळात तबलिघी जमातीला 'बळीचा बकरा' बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलंय. 

सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. कोर्टाच्या या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 'या प्रोपोगंडाच्या सहाय्याने मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी म्हटलंय.

शनिवारी 22ऑगस्ट  न्यायालयात या प्रकरणाची सुनाावणी झाली. यावेळी, 'दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं' असं न्यायालयानं म्हटलंय.

'याचिकाकर्त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई व्हायलाच नको होती, असं भारतातील सद्य संक्रमणाच्या आकडेवारीवरून दिसतंय. त्यावर पश्चाताप करण्याची आणि नुकसान भरपाईसाठी सकारात्मक पाऊल उचलणं गरजेचं आहे' असंही खंडपीठानं म्हटलंय.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. 'योग्य वेळेवर योग्य निर्णय' असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. 'भाजपला वाचवण्यासाठी मोठ्या जबाबदारीनं मीडियानं तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं. या संपूर्ण प्रोपोगंड्यानं देशभरातील मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं'