सिआरपीएफ भरती मध्ये पात्र उमेदवाराचा आसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून मृत्यू#Eligible candidate in CRPF recruitment drowns in Asolamendha lake canal # - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सिआरपीएफ भरती मध्ये पात्र उमेदवाराचा आसोलामेंढा तलावाच्या नहरात बुडून मृत्यू#Eligible candidate in CRPF recruitment drowns in Asolamendha lake canal #

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आसोलामेंढा तलावाचा मुख्य नहर सावली शहरातुन जातो , नुकताच शेतकऱ्यांचा पाण्याची टंचाई लक्षात घेता मुख्य नहराला आसोलामेंढा तलावातुन पाणी सोडण्यात आले ,नहरातुन पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे, आंघोळीसाठी गौतम वनकर या तरुणाचे नहरात उडी मारली असता त्याला पोहणे अशक्य असल्याने व नहरातुन पाणी जास्त जात असल्याने त्याचा त्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर मृतक युवक हा नुकताच जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सिआरपीएफ भरती मध्ये पात्र उमेदवार ठरला होता, परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभर लाकडाऊन व संचारबंदी करण्यात आली त्यामुळे भरती प्रक्रिया सुध्दा थांबविण्यात आल्या , आज अचानक तो नहरात आंघोळीसाठी गेल्याने व पोहता न येत असल्याने त्याचा मृत्यू झाला.

आसोलामेंढा तलावाच्या मुख्य नहराचे काम सुरू आहे , खोलीकरण करण्यात येत आहे यात सिमेंट कांक्रीट चा वापर करण्यात येत असल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन व्यक्ती पडल्यास त्याला पोहणी करण्यास किंवा बाहेर निघण्यासाठी अडथळा निर्माण होतो , असाप्रकार आज घडला. 


शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळावे , सिंचनासाठी सुविधा व्हावी या हेतूने बांधण्यात आलेल्या या नहरात मात्र खोलीकरण व सिमेंट कांक्रींट च्या मजबुती कारणांमुळे हा नहर जिवघेणा ठरत आहे..अचानक गौतम वनकर च्या दुर्दैवी मृत्यू मुळे कुटुंबासह सावली शहरात शोककळा पसरली आहे.