चंद्रपूर ब्रेकिंग :'डीएनआर' ट्रॅव्हल्स च्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा : न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला : डमी' महिला उभी करून नोंदणीकृत विक्रीपत्र #DNRTRAVELS CHANDRAPUR - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग :'डीएनआर' ट्रॅव्हल्स च्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा : न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला : डमी' महिला उभी करून नोंदणीकृत विक्रीपत्र #DNRTRAVELS CHANDRAPUR

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


'डीएनआर' या प्रतिष्ठीत खासगी बस वाहतूक कंपनीचे संचालक परमजितसिंग उर्फ पम्मा बलदेवसिंग डलेके यांनी अनुसूचित जातीच्या एका महिलेचा कोसारा येथील प्लॉट डमी महिला उभी करून नोंदणीकृत विक्रीपत्र करून घेतल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी परमजितसिंग पम्मा, कमलेश रमेश पेठकर, श्रीकांत अशोक रामनुजवार व अन्य एकाविरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी फेटाळला. त्यामुळे याप्रकरणी इंदू ताकसांडे यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. 


त्यांच्या तक्रारीवरून परमजितसिंग पम्मा बलदेवसिंग डलेके, श्रीकांत अशोक रामानुजवार आणि कमलेश रमेश पेटकर यांच्याविरूद्ध ११ फेब्रुवारी रोजी कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेच्या भीतीने हे तिघेही भूमिगत झाले आणि अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, जिल्हा न्यायालयाने या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. हे प्रकरण हायप्रोफाईलअसल्यामुळे पोलिसांकडून याची वाच्यता झालेली नाही.
परमजितसिंग पम्मा हा डीएनआर या खासगी बस वाहतूक कंपनीचा संचालक आहे. श्रीकांत रामानुजवार आणि कमलेश पेटकर है विक्रीपत्रात साक्षीदार असून, हे दोघेही परमजितसिंग पम्माचे कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. 

परमजितसिंग पम्मा आणि त्याच्या नातेवाईकांची पोलीस अधिकाऱ्यांशी त्याची सतत ठेवला आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक अटक टाळल्याची चर्चा पोलीस"वर्तुळात सुरू आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोना संक्रमनामुळे लॉकडाउन लागला आणि पोलिसांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, परमजितसिंग पम्मा हा कारवाईच्या भीतीने पंजाब पळाल्याची चर्चा आहे. इंदू ताकसांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करताना पोलिसांनी हा आखडता घेतल्याचे दिसते. अनुसूचित जातीच्या महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरूद्ध अनुसूचित जाती, जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करणे अपेक्षित होते. तसेच बोगस दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी कलम ४०९ भांदवि अन्वयेसुद्धा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी ही कारवाई जाणीवपूर्वक टाळली. इंदू ताकसांडे यांची 'डमी' उभी करून नोंदणीकृत विक्रीपत्र करून देणारी ती महिला कोण? असा प्रश्न उपस्थित झाला असून, पोलिसांनी अद्याप तिचा शोध घेतलेला नाही. 


या प्रकरणामुळे रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी आणि दस्तलेखकसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. इंदू ताकसांडे यांच्या नावावर उभ्या करण्यात आलेल्या 'डमी' महिलेचे आधार कॉर्ड कुठून तयार करण्याता आले, याचाही उलगडा अद्याप झालेला नाही.