चंद्रपुरात होणार राममंदिर भुमिपूजनाचा भक्तीमय सोहळा : रामरक्षा स्त्रोताचे पठन, मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलन - आ. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजन Devotional-ceremony-of-Ram-Mandir-Bhumi-Pujan-will-be-held-in-Chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपुरात होणार राममंदिर भुमिपूजनाचा भक्तीमय सोहळा : रामरक्षा स्त्रोताचे पठन, मोठ्या प्रमाणात दीप प्रज्वलन - आ. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजन Devotional-ceremony-of-Ram-Mandir-Bhumi-Pujan-will-be-held-in-Chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

उत्तरप्रदेशातील अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्री राममंदिराचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. दूपारी 12.15 वाजता भूमीपूजन होत असताना चंद्रपूर महानगरात श्री रामरक्षेचे भक्तीमय सूर निनादणार असून, सायंकाळी 6 वाजता घराघरात दीपप्रज्वलनाने अवघे आसमंत उजळणार आहे. 

माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा भक्तीमय सोहळा भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे अयोध्या येथील पवित्र श्री राममंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला हा विषय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सकारात्मकरित्या निकाली निघाला आणि देशातील करोडो रामभक्त नागरिकांना मोठा आनंद झाला. 

अयोध्या येथील श्री राममंदिर भारतवर्षाचे मानबिंदू आहे. या राममंदिरासाठी 492 वर्षे रामभक्तांनी संघर्ष केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व असंख्य कारसेवकांनी यासाठी कारसेवेच्या माध्मयातून केलेला संघर्ष या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरलेला आहे.

अयोध्येत दूपारी 12.15 वाजता भूमीपूजन होत असताना श्री रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे आणि सायंकाळी 6 वाजता घराघरात दीपप्रज्वलन करून श्रीरामाला वंदन करावे, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे. आवाहनाचे पत्रक भाजपातर्फे चंद्रपूरात घरोघरी वितरित करण्यात येणार असून, या पत्रकात, श्री रामरक्षा स्तोत्र ऐकण्यासाठी ‘क्युआर’ कोड देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कारसेवेचे स्मरण करणारा चित्रफिती बघण्यासाठीही ‘क्युआर’ कोड देण्यात आला आहे. ते स्कॅन करून रामरक्षा म्हणावी, अशी विनंती करण्यात आली आहे. 
या भक्तीमय सोहळयात सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी होणार आहेत. चंद्रपूरकर नागरिकांनी भाजपाच्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा व या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष (जिल्हा) डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे यांनी केले आहे.