2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी झाल्यानंतर दारूचा एकही थेंब जिल्ह्यात येणार नाही, अशी शपथ पोलिसांनी घेतली होती. मात्र, बंदीच्या दिवसापासूनच चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. यात राजकीय नेत्यांसह पोलीस विभागाचे अनेक कर्मचारीही सहभागी असल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे.
पोलिसांनी चंद्रपूर मार्गावरील चिंचाङा गावाजवळ आज केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील मोठे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचा मुलगा चालवीत असलेल्या स्पोर्टिंग क्लबच्या अध्यक्षासह एकास दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. यावरून राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या आडून दारू तस्करी केली जात असल्याचे उघड होत आहे.
चंद्रपूर रोडवरील चिंचङा चौकात शनिवारी रात्री पडोली पोलिसांनी एमएच - 34 बीबी 1474 कार चंद्रपूरकडे जात असताना देशी दारूचे 10 बॉक्स जप्त केले.
घुग्घुस येथील रहिवासी, पवन पुरैल्ली हे कमल स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर, घुग्घुस शाखेचे अध्यक्ष आहेत. ही संस्था माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्याशी निगडित आहे. त्याच्यासह विशाल धमेरा (शिवनगर) यास पडोली पोलिसांनी ताब्यात घेतले.
⭕️ आज न्यायालयात केले हजर -
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातून छुप्या मार्गाने अवैद्य दारूची विक्री पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी सिमा परिसरात नाकाबंदी केली जाते आणि सीमा मार्गावर ही तपासणी केली जाते.
या उपरही चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा कारवाईत पोलीस कर्मचारी राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सापडू लागल्याने अवैध दारू विक्री नेमक कोण मोहरे पुढे आहेत हे स्पष्ट होते.