देशात कोरोना लॉकडाऊन स्थितीत स्थायी नोकरी नसलेला प्रत्येक व्यक्ती आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. अश्यातच ज्यांची शेती प्रकल्पांमध्ये गेली व मोबदला किंवा नोकरी मिळाली नाही अश्या शेतकऱ्यांना मजुरीशिवाय पर्याय नाही. प्रकल्प पीडितांची व्यथा कागदोपत्री कोणीही ऐकून घेण्याच्या स्तिथीत नसल्याने नाईलाजास्तव अनेक ठिकाणी मागणी पूर्ण करवून घेण्याकरिता वेगवेगळे आंदोलनात्मक मार्ग अवलंबावे लागतात.
अश्याच काही प्रकल्प पीडित येथील वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं आज आठ प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत.
पिडीतांनी समाज माध्यमांवर जारी केलेल्या चित्रफितीनुसार वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं.
वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी देण्याचा करार वीज कंपनीने केला होता. मात्र अनेक वर्षे उलटूनही नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांनी आज ही विरुगिरी केली.