येत्या सोमवारी बल्लारपूर बंद : कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार कार्यालयाची नऊ पथके : कोणीही घराबाहेर पडू नये #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

येत्या सोमवारी बल्लारपूर बंद : कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार कार्यालयाची नऊ पथके : कोणीही घराबाहेर पडू नये #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -थोडक्यात -

बल्लारपूर कोरोना वर नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून बल्लारपूर तालुका गर्दीचा दिवस असलेल्या प्रत्येक सोमवारी बंद ठेवण्यात येणार आहे.यासंबंधी आदेश उपविभागीय अधिकारी यांनी व्यापारी संघ आणि अधिकारी यांच्या बैठकीत झालेल्या ठरावा प्रमाणे निर्गमित केले.

आदेशाच्या कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार यांनी नऊ ठिकाणी नऊ पथके तैनात केली आहेत.प्रत्येक पथकामध्ये एक वर्ग दोन दर्जाचा अधिकारी तर नगरपालिका,पोलीस, पंचायत समिती,तहसिल यांचे कर्मचारी अशी पथकाची रचना करण्यात आली आहे.

नियुक्त पथकामार्फत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल.सोमवारी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.