चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर कोरोना संक्रमित : #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर कोरोना संक्रमित : #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना COVID - 19 विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने होत आहे.जिल्ह्यातील औद्योगीक शहर असलेले घुग्घुस येथील वॉर्ड नं.02 मुख्य मार्गावरील खाजगी रुग्णालयातील डॉक्टर हे कोरोना पोझीटिव्ह निघाल्यामुळे घुग्घुस परिसरात कोरोनाची दहशत पसरली आहे.

यांच्याकडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झालेली आहे.यापूर्वी घुग्घुस येथील इंदिरा नगर 02, रामनगर 04, शालीकराम 02, आणि आता वस्ती परिसरात पहिला रुग्ण मिळाला आहे.

घुग्घुस येथे संचारबंदी, सामाजिक अंतराचा सातत्याने फज्जा उडविला जात आहे.व्यापारी प्रतिष्ठाना कोरोनाचा विसरच पडला आहे तर दुसरीकडे एका विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांना कोरोना काळात शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते जमवून वाढदिवस साजरा करण्याचा छंदच लागला आहे.

रामनगर येथील 31 केकच्या धम्माल पार्टी नंतर वॉर्ड नंबर 02 मधील शरद गेडाम यांच्या पार्टीत शामिल नेत्यांवर कारवाई न करता घुग्घुस पोलिसांनी नोटीस देऊन वेळ मारून नेल्यामूळे जनतेत नाराजीचे सूर उमटले आहे.