खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात वृत्त :
चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य पोलीस ठाणे रामनगर येथे कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा गेडाम (31) यांचा नागपूर येथे उपचारार्थ मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त असून त्या कोरोना बाधित होत्या.
बाधित झाल्यावर चंद्रपूर येथे आधी उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले तेथे आज मृत्यू झाल्याचे कळते.
या महिला शिपायाला चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. करोनाबाधित असल्याने आणि किडनीचा त्रास असल्याने तिची प्रकृती अधिक गंभीर झाली. त्यामुळे तिला पुढील उपचारांसाठी नागपूरला पाठवण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला .