धक्कादायक ! चंद्रपुरात अनेक राजकारणी कुटुंब / बडे अधिकारी कोरोना बाधित : आमदार,जीप समाज कल्याण सभापती : महापौरांचे कुटुंब बाधित : नागरिकांनी गर्दी टाळून सतर्क राहावे #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक ! चंद्रपुरात अनेक राजकारणी कुटुंब / बडे अधिकारी कोरोना बाधित : आमदार,जीप समाज कल्याण सभापती : महापौरांचे कुटुंब बाधित : नागरिकांनी गर्दी टाळून सतर्क राहावे #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार कोरोना पॉझिटिव्ह ठरल्यानंतर आज आणखी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम (सिंदेवाही ) व कुटुंबातील 2 सदस्य कोरोना बाधित झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पत्नी या पोलीस विभागात कार्यरत असून त्यांना आधी बाधा झाल्यानंतर सभापती व इतर एक सदस्य बाधित झाल्याचे कळते.


चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार ह्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना सुद्धा कोरोनाची दोन दिवसांपूर्वी बाधा झाली आहे.

चंद्रपुरातील एका मोठ्या पर्यावरण सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष्यांच्या लहान भावाला काल बाधा झाली आहे. 

त्याचबरोबर जिल्ह्यातील नावाजलेले मोठे पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी देखिल आताच आलेल्या माहितीनुसार कोरोना असल्याचे कळले आहे.

ही सर्व अधिकतर सामान्य नागरिकांच्या गराड्यात वावरणारी मंडळी आहेत. त्यामुळे ह्या कोरोना काळात नागरिकांनी स्वतःच दक्षता बाळगत अनावश्यक गर्दी टाळण्याची गरज आहे.