खबरकट्टा / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात दोन बालचित्रकार चित्राच्या माध्यमातून कोरोना या रोगाविषयी जनजागृती करत आहेत. संकल्प आणि कुशल मशारकर अशी या दोन भावांची नावे आहेत.
ते चंद्रपूर शहरातील मातोश्री शाळेत अनुक्रमे इयत्ता 4 थी तर ukg च्या वर्गात शिकत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.
या सुट्टीचा सदुपयोग करत घरबसल्या ही दोन भावंडे आपल्या चित्रातून वेगवेगळे संदेश देत आहेत.
कोरोना माहामारीची चित्रांद्वारे कोरोना गंभीरता आणि लॉकडाउनचे महत्त्व नागरिकांच्या सहज लक्षात आणून देत आहेत. घरातच राहा,सुरक्षित राहा असा संदेशही त्यांनी आपल्या चित्रांतून दिला आहे.