खबरकट्टा / चंद्रपूर :
मूल शहरातील काँग्रेसचा एक मोठे नेते आज टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ माजली आहे.
हे मोठे नेता मुल काँग्रेस च्या अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने बाजार समितीच्या आवारात, शेतकरी भवन मध्ये आज मूलचे २४ बड्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना क्वारंटाईन करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती संबंधित, जिल्हा कॉंग्रेस वरिष्ठ पदाधिकारी असलेला हा नेता आज सरकारी दवाखान्यात सर्दी खोकला आजार दाखविण्यासाठी गेला होता. डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांनी, रॅपिड अन्टीजेंट टेस्ट करून घेतली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आढळल्याने, तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याना. तातडीने चंद्रपूरला पुढील उपचारासाठी रवाना केले.
या नेत्यांच्या संपर्कात अनेक नेते-कार्यकर्ते आले असून, यामुळे शहरात खळबळ माजली आहे.मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार मूलच्या बाजार समितीमध्ये कॉंग्रेसच्या २४ नेते कार्यकर्त्यांना कोरंटाईन करण्यात आले आहे.