राजुरा धोपटाळा वेकोलि टाँऊन शिप मध्ये आढळला एक यूवक काेराेना पाँझिटीव्ह?प्रशासनाने केला परिसर सिल!#covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा धोपटाळा वेकोलि टाँऊन शिप मध्ये आढळला एक यूवक काेराेना पाँझिटीव्ह?प्रशासनाने केला परिसर सिल!#covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा समिप असलेल्या सास्ती टाँऊन शिप(क्वार्टर) मध्ये काल बुधवार दि.१२आँगष्टला रात्री एक यूवक काेराेना पाँझिटीव्ह आढळुण आल्याने राजूरा प्रशासनाने ताे परिसर तातडीने सिल केले असल्याचे खात्रीलायक वृत्त  प्राप्त झाले आहे.

दरम्यान त्या वसाहत मधील वास्तव्य करणारा यूवक नागपूर वरुन काल आला असल्याचे बाेलल्या जाते .सध्या त्या वसाहतीत भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असुन प्रशासन त्या वसाहतीकडे जातीने लक्ष पुरवित आहे .

प्राणघातक व जीवघेणा-या काेराेनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झपाट्याने वाढत असुन काल च्या तारखेत एकुण काेराेना बाधितांची संख्या 944 च्या घरात पाेहचली हाेती.

चंद्रपूर जिल्हा प्रशासन काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यांसाठी दिवस रात्र तारेवरची कसरत करीत आहे .हे मात्र तेवढेच खरे आहे.घरीच राहा! सुरक्षित राहा ! विनाकारण घराबाहेर पडु नका असे आवाहन जिल्हा प्रशासन वारंवार करीत आहे .आता पर्यंत काेराेनामुळे सहा जणांचा मृत्यु या जिल्ह्यात झाला आहे .