बोगस कोविड योद्धा प्रमाणपत्रांचा बाजार : योध्याच्या प्रमाणपत्र वाटपाचा काही सामाजिक संस्थां चालवित आहेत गोरखधंदा #covid-19 yoddha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बोगस कोविड योद्धा प्रमाणपत्रांचा बाजार : योध्याच्या प्रमाणपत्र वाटपाचा काही सामाजिक संस्थां चालवित आहेत गोरखधंदा #covid-19 yoddha

Share This
खबरकट्टा / सामाजिक : संपादकीय -

कोरोना संदर्भात तुम्ही काही काम करा किंवा नका करा पण तुम्हाला लगेच काही सामाजिक संस्था कोरोना योदद्धाचा पुरस्कार देऊन सन्मानित करतील. कारण काही संस्थानी या पुरस्कारांचा बाजार मांडला आहे. 

यामुळे मात्र खऱ्या कोरोना योद्धांचे खच्चीकरण होत आहे.
खरतर आपल्या प्राणांची पर्वा न करता लढणारे डॉक्टर्स, पोलिस, सफाई कर्मचारी, पत्रकार, राजकीय अशा अनेक क्षेत्रातील व्यक्ती आपली सेवा अखंडितपणे करताना दिसून येत आहेत. 

पण त्या खऱ्या योध्यांकडे दुर्लक्ष करून फक्त सोशल मीडियावर मिरवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या हव्यसापोटी काही संस्था ऊठसूट कुणालाही प्रमाणपत्र देत सुटल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता पुरस्कार मिळवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण पण होतेय.  

पण यात जो प्रामाणिक काम करतोय त्या योध्याचं मात्र खच्चीकरण होतांना दिसून येतंय. फक्त नाव, गाव दिल की लगेच पुरस्कार मिळतो, तुम्ही काही काम करा किंवा नका करा.  तरी अशा या सामाजिक संस्थांनी दुसऱ्यांना पुरस्कार वाटण्यापेक्षा स्वतः कोरोनासाठी रस्त्यावर उतरून काम करून दाखवले पाहिजे असे सामाजिक मत समोर येत आहे.