कापसाचा चुकारा देण्यास टाळाटाळ : युवक काँग्रेसचे चिमूर विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल #cotton - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कापसाचा चुकारा देण्यास टाळाटाळ : युवक काँग्रेसचे चिमूर विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल #cotton

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : चिमूर : 

तालुक्यातील वहानगाव येथील शेतकरी सुधाकर आत्माराम थुटे यांच्याकडून घेतलेल्या ७४ क्विंटल ६५ कि. कापसाचा चुकारा देण्यास टाळाटाळ करणारा युवक काँग्रेसचा चिमूर विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील याच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थुटे यांनी ७४ क्विंटल ६५ किलो कापूस ५००० रुपये प्रतिक्विंटल  प्रमाणे १ जून २०२० रोजी गौतम पाटील यांस विकला. सदर मालाची एकुण किंमत ३,७३,२५० रुपये झाली. या रक्कमेपैकी ३५,००० रुपये नगदी स्वरुपात देवून उर्वरित रक्कमेपैकी भारतीय स्टेट बँक शाखा-सावरी (बिड.) या बँकेचा धनादेश क्र.१३३९४७ नुसार रुपये १,२३,४०० आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चंद्रपूर येथील धनादेश क्र. १०४६४७ नुसार रुपये २,००,००० याप्रमाणे दोन धनादेश दिले. 

सदर शेतकऱ्यांना दोन्ही धनादेश बँकेत जमा केले असता पैश्याअभावी धनादेश वटले नाही. वारंवार संपर्क करून व घरी भेट देऊनही रक्कम देत नसल्याने १० जुलै रोजी २०२० रोजी पोलीस स्टेशन शेगाव (बु.) येथे तक्रार दाखल करण्यात आली. गौतम पाटील काँग्रेस पदाधिकारी असल्याने कारवाई होत नव्हती. 

याबाबतचे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित करून याकडे पोलीस विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी शेगांव पोलिसांनी गौतम ठाकसेन पाटील रा. गुजगव्हान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.