रक्षाबंधन सणावर कोरोना विषाणुचे सावट :डिजिटल रक्षाबंधन साजरी करण्याकडे नागरिकांचा कल; यंदा राखी स्टाॅलवर गर्दी नाही... प्लॉस्टीक कार्टुन राखी गायब #Corona virus outbreak at Rakshabandhan festival - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रक्षाबंधन सणावर कोरोना विषाणुचे सावट :डिजिटल रक्षाबंधन साजरी करण्याकडे नागरिकांचा कल; यंदा राखी स्टाॅलवर गर्दी नाही... प्लॉस्टीक कार्टुन राखी गायब #Corona virus outbreak at Rakshabandhan festival

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी बाजारपेठेत दरवर्षी पेक्षा यंदा राखी चे प्रमाण खूप कमी आहे. पुर्वी रक्षाबंधनाच्या १५-२० बाजार पेठेत कार्टुन व नवीन राख्या उपल्ब्ध व्हायच्या. यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात होती.तसेच भेटवस्तू व शोभेच्या वस्तू ची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती.मात्र यंदा मात्र ग्राहकां कडुन फार कमी खरेदी केली जात आहे .असे व्यापारान कडून कोव्हिड १९ महामारी चा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
    
रक्षाबंधन सणाला केवळ दोन दिवस उरले देखील बाजारात फारशा प्रमाणात राखी दिसत नाही.दरवर्षी जागोजागी असणाऱ्या स्टॉल आता गायब झाले आहेत.देशात रक्षाबंधन बहीण-भावाचा प्रवित्र सण मानला जातो.व दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.मात्र यंदा कोव्हिड १९ महामारी चे सावट बहीण- भावांच्या प्रवित्र सणावर देखील आल्याचे दिसून येत आहे.
   
दरवर्षी निरनिराळ्या तऱ्हेच्या  राख्यांनी बाजारपेठ फुलून दिसायची यंदा मात्र बाजारपेठ ओस पडली दिसत आहे.
सध्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच राखी स्टॉल बाजारात दिसुन येत आहे.व त्या स्टॉल वर मोती- गोंडा असलेल्या साध्या राखी उपलब्ध आहेत.

काही स्टॉल वर मागच्या वर्षी उरलेल्या राखी विक्री असल्याचे दिसून येत आहेत.त्यामुळे बाजारात राखी स्टॉल वर गर्दी दिसून येत नाही.सध्या लॉकडाऊन व संचारबंदी मुळे बाहेर दुसऱ्या शहरात असलेल्या बहिणी भावाकडे जाऊन राखी बांधू शकत नाही.त्यामुळे पोस्टाने राखी पाठवली जात आहे. गोंडाची राखी वजनाने हलकी असल्याने बाकी राखी पेक्षा या राखी ची विक्री जास्त आहे.

मागच्या वर्षी १० रुपया पासुन ३०० पर्यंत  राखी स्टॉल विक्री साठी ठेवलेल्या होत्या.पण यंदा विकल्या ही गेल्या आहेत.मात्र यंदा राखी किमंत घसरणीवर आल्या आहेत. या वर्षी ३ रुपयांपासून १०० रूपया पर्यंत राख्या उपलब्ध आहेत.देशावर असलेले संकट लक्षात घेऊन बहीण-भावाचा सण हा डिजिटल पध्दतीने करण्याचें ठरविले आहे.मात्र यात सगळ्यात बहिण भाऊ एकत्र येऊन रक्षाबंधन सण साजरा करता येणार नाही या बद्दल निराशा आहे.

⭕️ प्रतिक्रिया- 
यंदा राखीची किमंत कमी केली असुन त्या देखील राख्या विकल्या गेल्या नाहीत.व खुप साध्या सोप्या पद्धतीच्या राखी बाजारात उपलब्ध आहेत. -पुष्पा गराडे राखी विक्रेता तथा नगरसेविका ब्रह्मपुरी.