काँग्रेस च्या बड्या नेत्याचे अश्लील चाळे : विषय थेट पोहोचलाय दिल्लीत : आत्महत्यांचे सत्र : वाचा चंद्रपूर-यवतमाळ च्या राजकारणातील " ययाति "#congress - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस च्या बड्या नेत्याचे अश्लील चाळे : विषय थेट पोहोचलाय दिल्लीत : आत्महत्यांचे सत्र : वाचा चंद्रपूर-यवतमाळ च्या राजकारणातील " ययाति "#congress

Share This

खबरकट्टा / व्यक्तिविशेष -


प्रत्येक महत्वकांक्षी मराठी माणसाने कै. वि. स. खांडेकरांचे " ययाति " एकदा वाचावेच असा मेरुदंड या ललित कादंबरीने मराठी साहित्यात निर्माण करून ठेवलायं  तो उगाच नव्हे. महत्वकांक्षा, प्रेम, संयमाचा अतिरेक कसा दुराव्यास्थेकडे घेऊन जातो ही ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणी कचाची भक्तिगाथा ऐतिहासिक स्मरणात राहते. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे दुर्गुण असणारा व्यक्ती कधीही उत्तम राज्य करू शकत नाही. स्त्री लोभामुळे अनेक राजांची व त्यापाठोपाठ आपसूकच राज्याचीही अधोगती झाली हे आपण जाणतोच.

नव्हे नव्हे खबरकट्टा ची साहित्यावर चर्चा नव्हे तर अश्याच साधर्म्य असलेल्या चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यातील एका बड्या राजकीय प्रस्थाच्या महत्वकांशी कामकथेतून होणारी स्त्री समाज हानी, जनतेच्या विकासकामांची अधोगती वाचकांपर्यंत पोहिचविण्याचा प्रयत्न आहे.


एकीकडे काही राजे जसे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रियांविषयी आदरयुक्त दृष्टीकोन होता. त्यामुळे ते जाणते राजे ठरले. संतांनी देखील  "परस्त्री माते समान, परधन नरकासमान" हा संदेश दिला आहे. मात्र चंद्रपुरातील एका बड्या नेत्यांचे अश्लील कारनामे आपल्याला समजले तर या उंच शिखरावर असलेल्या नेत्याला स्त्री लोभ कुठे घेऊन जाईल आणि येणारा काळ चिंतेचा ठरेल हे मात्र नक्की !बऱ्याच अनेक बड्या नेत्यांचे पॉलिटिकल करियर देखील स्त्री लोभाने संपुष्ठात आले. प्रगतीच्या उंच शिखरावर असताना तळाशी यावे लागले,दुरवस्था झाली अशी शेकडो उदाहरणे समाजात दिसतात. 


काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्याने एका प्रतिष्ठित सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिलेशी अश्लील उद्योग केले असल्याची व ते उद्योग आता थेट देशाचे राष्ट्रपती व काँग्रेस पक्षश्रेष्ठी श्रीमती गांधी यांचेपर्यँत लेखी स्वरूपात पोहोचले असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणासहित चंद्रपुर - यवतमाळात आहे. 

 

विशेष म्हणजे ही महीलासुद्धा प्रचंड महत्वकांक्षी असून या आधी एका माजी मंत्र्यांने केलेल्या अश्लील व्हाट्स अँप मॅसेजच्या प्रकारामुळे तत्कालीन सत्ताधारी मुंबई येथील मंत्र्याची विधानसभेत तिकीट पक्षाने कापली.


दरम्यान च्या काळात या सामाजिक संस्थेतील महिलेचे देशपातळीवर प्रस्थ व काँग्रेस पक्षात खुला राजकीय वावर ओळखून या संधीसाधू बड्या नेत्याने तिच्याशि सलगी वाढविली. अर्थातच यात दोन्ही बाजूंची उच्च राजकीय महत्वकांक्षा कारणीभूत होतीच. या ययाति महाशयांनी राज्यातील एका राजकीय कुटुंबातून निघून दिल्लीतल्या कटुंबात स्थान मिळविण्यास याच महिलेचा वापर करून घेतल्याचे सांगितले जाते. आपली पोळी भाजून घेण्यासाठी कामवासनेचा उपयोग करता करता एका मतदार संघात त्या महिलेला निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल असा शब्दसुद्धा या चंद्रपुरातील ययातीने  महिलेला दिला होता. मात्र,स्वतः ची महत्वकांक्षा पूर्ण होत एकमेव म्हणून राज्यात उदयास येताच चित्र बदलले. पुढे आपला विश्वासघात झाला या भावनेतून ती महिला दुखावली गेली. दुसरीकडे त्या महिलेची वासनेची सवय झालेला हा नेता वारंवार मागे लागला होता. बाई आणि बाटलीच्या नादात पुरुष सर्वस्व विसरतात असे म्हणतात. आपले उच्च पद आणि प्रतिमा याला न शोभणारे हिणकस कृत्य हा नेता करू लागला. त्रस्त झालेला प्रेयसीने काही संबंधितांना भेटून आपबिती सांगितली.


मात्र आता इथून सुरु झाली  " कहाणी घर घर की " पण घरच्या चार भिंतीत नव्हे तर चक्क देश पातळीवर. आता प्रेयसी सुद्धा पेटून उठली कारण  प्रतिष्ठा,संपत्ती असूनही माणसांना महत्वकांक्षेची सोनेरी स्वप्ने शांत झोप घेऊ देत नाहीं.  तिने एक नामवंत वरिष्ठ पत्रकार व साहित्यिकांच्या मदतीने सभा भरविली व विषय थेट जाऊन पोहोचला दिल्लीत. 

 

आता गल्लीतील गोष्ट दिल्लीत जाऊन पोहोचल्यावर भल्याभल्यानां घाम तर फुटणारच. या प्रस्थाने हा घाम(गम ) बाटलीत जिरवायला सुरुवात केली. दरम्यान त्या नेत्याच्या पत्नीला ही वार्ता व त्या प्रणय लीलांकरिता उपयोगात आणलेल्या " हाऊस " बद्दल कळताच तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला.लॉकडाऊन काळात एका मोठ्या खाजगी दवाखान्यात  तिच्यावर उपचार झाल्याचे बोलले जाते. सदर वृत्त कुठेही माहिती होणार नाही याची दक्षता घेतली गेली. सुदैवाने डॉक्टरांच्या उपचारा नंतर त्या स्त्रीलंपट नेत्याची नेता  पत्नी बचावली.परिस्तिथी हाताबाहेर जाण्याचे चिन्ह दिसताच या ययाति महाशयांनी आता सहज सोपे तंत्र अवलंबले : माफीनाम्याचे....!!! विनंती, विनवणी, माफी हे शब्द अनेकदा बदल घडवितात इथेही तसेच झाले पण हा बदल थंड नव्हता.आपली फसवणूक झाली, राजकीय वापर करून घेण्यात आला या आगीत प्रेयसी होरपडली व तिनेसुद्धा सामाजिक हानीच्या भीतीपोटी आत्महत्या तंत्र अवलंबले. सुदैवाने तात्काळ नागपुरातील खाजगी इस्पितळात उपचार झाल्याने जिव बचावला. तरीही या बड्या नेत्याचा स्वभाव बदलला नाही. या नेत्याने आपल्या पक्षात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या बायकोचाही उपभोग घेतला. ही बातमी या बड्या नेत्याच्या पत्नीला कळताच आणखी घरात वादंग निर्माण झाले. प्रचंड वैर तयार झाले. आता लोकांच्या / समाजाच्या नाईलाजास्तव एकमेकांना सोबत राहावे लागत आहे. 


परंतु, एका मोठ्या सामाजिक क्षेत्रातील गणमान्य उच्चशिक्षित महिलेशी असलेले संबंध आणि आता अन्य महिलांसोबत संबंध पुढे येत असल्याने येणाऱ्या काळात या नेत्याची चांगलीच पंचाईत होऊ शकतो. दिल्लीत गमावलेली प्रतिष्ठा भविष्यातील राजकीय मार्गक्रमणास बाधक ठरू शकते याची भनक या लंपट नेत्यास लागली असल्याने इतरही पर्यायांच्या तयारीत असल्याचे चर्चेत आहे. 


कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी तो आरवल्या शिवाय राहात नाही. तसेच, या नेत्याच्या पॉवर मुळे आज प्रकरण पुढे येत नसले तरी लोकांत जोरदार चर्चा असून एकदिवस भांडाफोड नक्की होईल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, 

"काम क्रोध लोभादि मद प्रबल मोह कै धारि।

तिन्ह महँ अति दारुन दुखद मायारूपी नारि||" 

असे शास्त्रात सांगितले आहेच. नियतीने ठरवलं की, स्त्री लोभाने भलेभले महाल कोसळले, मोठी नेते संपलीत. प्रचंड दुरवस्था झाली, ही वेळ या नेत्यावर येऊ नये म्हणून आता तरी सुधारावे असे बोलले जात आहे.असो, घरोघरी मातीच्या चुली,पण नेते महोदय आजही मातीच्या  चुलीवर शिजणारे अन्न खाणाऱ्या कित्येक सामान्य जनतेने आपल्याला निवडून दिले ते या रासलीलांच्या उपभोगांकरिता नव्हे तर क्षेत्राच्या विकासाकरिता याची आठवण  बाटलीची उतरल्यावर कधी करत जा एवढेच अपेक्षित...!! नाहीं तर पुढच्या खेपेला वाट दाखवलाही गावोगावी कमिट्या स्थापन होईल हे मात्र नक्की. 

वाचा लवकरच : नेत्याने केली वासनेच्या कळसातून गनफायरिंग.... !!!