एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती सहित युवकाला अटक : रामनगर पोलीस हद्दीतील वाढती गुन्हेगारी #chandrapurpolice - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती सहित युवकाला अटक : रामनगर पोलीस हद्दीतील वाढती गुन्हेगारी #chandrapurpolice

Share This


खबरकट्टा / चंद्रपूर : 

रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एक विदेशी पिस्टल आणि गुप्ती हस्तगत केली आहे.

रोहित उर्फ पंडीत दिनेश शर्मा (३२) रा. रयतवारी कॉलरी चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रोहित हा कोणतातरी हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनिय माहिती रागनमर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला डिस्पेंसरी चौकात जावून चौकशी केली असता संशयास्पदरित्या तो आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीची पिस्टल आणि एक धारदार गुप्ती आढळून आली. 

त्याच्याकडे परवानाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला अटक करून कलम ३, २५ भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या विदेशी बनावटीची पिस्टल ची किंमत १० हजार रूपये आणि गुप्तीची किंमत ५०० रूपये आहे. 

सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस हवालदार धनराज करकाडे, संजय आतकुलवार, पोलिस शिपाई प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, अमोल धंदरे, रविंद्र पंधरे यांनी केली आहे.