न्यायपूर्ण मागण्यांसाठी लोयड्स मेटल कंपनी कामगारांचे कामबंद आंदोलन.#chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

न्यायपूर्ण मागण्यांसाठी लोयड्स मेटल कंपनी कामगारांचे कामबंद आंदोलन.#chandrapur

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर/ घुग्घुस :- 

येथील लोयडस मेंटल्स कंपनीत ऐकून 06 ठेकेदार आहे.ज्यात देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे, रवी ठाकरे, राजू अडपेवार,अलका जंगम, ग्रीन हौऊस यांच्याकडे 16 सुपरवाईजर आहे.


हे सुपरवायझर कोरोना काळात 06 महीने पगारा अभावी कार्यरत होते मात्र ठेकेदारातर्फे यांना अति अल्प व 03 महिन्याचे वेतन दोन दिवसा आधी म्हणजेच 12 ऑगस्टला देण्यात आले.


ठेकेदार व कंपनी अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामूळे तसेच कामगारांना काम व वेतन वेळेवर मिळत नसल्याने घुग्गुस येथील लोयड्स मेटल कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कामगार संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी वेतनाची गोष्ट निघते नेमकं तेव्हाच कोरोना, लॉकडाऊन आहे असा समज कामगारांना दिल्या जातो, परिस्थिती काय आहे त्यांची जाणीव सर्व कामगारांना आहे. परंतु कंपनीचे उत्पादन सुरळीत सुरू असताना वेतन व्यवस्थित न देणे हा तर कामगारांवर अन्याय आहे.


कामगारांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहे प्रति महीना 26 दिवस प्रत्येक कामगाराच्या हाताला कंपनीने काम द्यावे, लॉकडाऊन काळातील उर्वरित वेतन त्वरित देण्यात यावे, कामगारांचा पगारवाढ करारनामा करण्यात यावा, कामगारांचे ग्रेडेशन करण्यात यावे, 58 वर्षे झालेल्या कामगारांना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकले त्यांना पूर्वरत कामावर घ्यावे, आजपर्यंत ज्या कामगारांचा कंपनीत काम करतेवेळी मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना कंपनीत सामावून घ्यावे, लॉकडाऊन काळात सुपरवायझर चे संपूर्ण वेतन देण्यात यावे अश्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.मागणीवर दखल न झाल्यास कामगार काम सुरू करणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.