ट्रॅक्टर उलटुन तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : रोवणी करण्यासाठी चिखल करीत असतांना ट्रॅक्टर उलटले #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ट्रॅक्टर उलटुन तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू : रोवणी करण्यासाठी चिखल करीत असतांना ट्रॅक्टर उलटले #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -

चिमूर तालुक्यातील मौजा बोरगाव (बुट्टी आंबेनेरी जवळ) येथे आज 1ऑगस्ट दुपारी 2 वाजताच्या सुमारास नितेश गुलाब घरत 25 हे स्वतःच्या शेतात रोवणी करण्यासाठी ट्रॅक्टरने चिखल करत होते. चिखल करीत असतांना ट्रॅक्टर चिखलात फसला. 

बल्ली लावून ट्रॅक्टर चिखलातून काढत असतांना ट्रॅक्टर पलटल्यामुळे ट्रॅक्टरखाली दबून तरुण शेतकरी नितेश चा शेतातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भिसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पण त्याआधी नितेश ला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. 

धान रोवणी करण्यासाठी स्वतःच्या शेतातील बांदीत चिखल करीत असताना ट्रॅक्टर फसले असता नितेश त्याला बल्ली लावून काढण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे नितेशचा जागेवरच मृत्यू झाला. शवविच्छेदना करीता शव चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे घरत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. भिसी पोलीस पुढील तपास करीत आहे.