चंद्रपूर ब्रेकिंग : मनोहर पाऊणकरांचा सिडीसीसी बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा #cdccchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : मनोहर पाऊणकरांचा सिडीसीसी बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा #cdccchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनुकंपा नोकर भरती प्रकरण सध्या जिल्ह्यात गाजत आहे. सध्या या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा यांची चौकशी सुरु आहे. अनुकंपा नौकरी भरती व्यतिरिक्तही अनेक पैश्याच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु आहे. अश्यातच काल 24 ऑगस्टला सिडीसीसी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पाऊनकर यांच्या कार्यकाळात झालेल्या अनुकम्पा नोकर भरती प्रक्रियेत मोठा अपहार झाल्याची तक्रार बँकेचे संचालक संदीप गड्डमवार यांनी केली होती, त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते.

गुन्हा दाखल झाल्याच्या काही दिवसांनी ते स्वतः पोलिसांना शरण आले, या प्रकरणात 10 ऑगस्टला बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांनी माई फर्म द्वारे 7 कोटी 30 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिली, या प्रकरणात साळवे, गिरी सह पाऊनकर यांचेवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

प्रकरण वाढत असल्याचे बघता बँकेचे अध्यक्ष पाऊनकर यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला असे चर्चेत आहे.