चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सरकारी लेखापरिक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराची व्याप्ती वाढलीअ सल्याने काही संचालकांकडून याप्रकरणाच्या तपासासाठी ईडी कडे तक्रार करण्याची तयारी सुरू आहे.
बँकेतील अनुकंपातत्वावर नोकरभरतीत गैरव्यवहार आणि साहित्य खरेदीत घोटाळा केल्याप्रकरणी बंकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाऊणकर यांच्यासह चौघेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, मनोहर पाऊणकर यांच्या अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळातील विशेष सरकारी लेखापरिक्षण सुरू आहे. यामध्ये आर्थिक
गैरव्यवहाराची व्याप्ती फार मोठी असल्याने लेखापरीक्षक गोंधळून गेले आहे. साहित्य खरेदीत ७ कोटी ३० लाखरुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार संचालक रवींद्र शिंदे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली.मात्र, हा घोटाळा साधारणतः ३५ते ४० कोटी रुपयापर्यंत असल्याचे लेखापरिक्षकांच्या निदर्शनास आले आहे.
हा आधार घेत बँकेतील संपूर्ण आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी 'ईडी मार्फत करण्यात यावी, अशी चर्चा सुरू असून,पुढील तीन दिवस बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठका आहे.
या बैठकीत हा मुद्दा लावून धरत 'ईडी'कडे तक्रार करण्यावर बहुतेक संचालकांचे एकमत होताना दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेत सर्वसाधारण लोकांचा पैसा आहे. आणि सामान्य लोकांच्या पैशाची पदाधिकाऱ्यांकडून होणारी लूट गंभीर स्वरूपाची आहे. बँकेचा एनपीए २७ टक्केच्या पुढे गेला आहे.
ही बाबसुद्धा तितकीच गंभीर आहे. नव्या धोरणानुसार 'ईंडीकडे ५० लाखापेक्षा अधिकचा गैरव्यवहार असलेले प्रकरण चौकशीसाठी देता येवू शकते. याचा आधार घेत आणि गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराचे प्रकरण चौकशीसाठी 'इंडी'कडे सोपविण्याची तयारी सुरू आहे.
हे प्रकरण 'ईडीकडून सोपविल्यास मनोहर पाऊणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.