वाघाने गोठ्यातील गायीची केली शिकार -: खरबी- माहेर येथील घटना :- वाघाच्या दहशतीने नागरिकांत भितीचे वातावरण #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाघाने गोठ्यातील गायीची केली शिकार -: खरबी- माहेर येथील घटना :- वाघाच्या दहशतीने नागरिकांत भितीचे वातावरण #bramhpuri

Share This

खबरकट्टा / ब्रह्मपुरी : 

ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी- माहेर येथील दिलीप मोतीराम आडकिने यांच्या गोठ्यात असलेली गाय वाघाने गावात शिरून गोठ्यातील गायीला ठार केले.हि घटना सुमारे तीन- चार वाजता घडली.
गाय मालक दिलीप आडकिने हे तीन वाजता सुमारास गायीला गवत टाकण्यासाठी गेले असता गाय पडुन दिसली.व वाघ समोर जाताना दिसले. लगेच आरडाओरड केली. तर गावातील नागरिक जमा झाले व वाघाला पळवून लावले.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले.व पंचनामा करण्यात आले.दिलीप आडकिने यांना उत्पन्नाचे साधन म्हणून गायीचे दूध विकुण कुटुंबातील उदरनिर्वाह करीत होते.


पण वाघाने गोठ्यातील गाय ठार केल्याने उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.