ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला जि.प. सदस्या अँड. दिपाली मेश्राम यांच्या वतीने आँटोमँटिक सँनिटायझर मशीनची भेट #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला जि.प. सदस्या अँड. दिपाली मेश्राम यांच्या वतीने आँटोमँटिक सँनिटायझर मशीनची भेट #bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी/
       
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

हिच बाब ओळखून नेहमीच राजकारणसोबतच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहणाऱ्या चौगान-खेडमक्ता जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या अँड. दिपालीताई रविंद्र मेश्राम यांच्या वतीने ब्रम्हपुरी येथील पोलीस स्टेशनला आँटोमँटिक सँनिटायझर मशीन भेट देण्यात आली.

पोलीस ठाण्यात दिवसभर तालुक्यातील अनेक नागरिक पोलीस स्टेशनविषयक कामांसाठी येत असतात. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या मुख्य द्वारावर सदर मशीन मांडण्यात आली असुन ही मशीन १० सेकंदात व्यक्तिच्या शरीरावर निर्जंतुक करीत असते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी ही मशीन उपयोगी पडणार आहे.

या सँनिटायझर मशीनची भेट देतांना ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मेश्राम, पं.स.माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य विलास उरकुडे, पं.स. उपसभापती सुनिताताई ठवकर, पं.स. सदस्या सुनंदाताई ढोरे, पं.स. सदस्या ममताताई कुंभारे, माजी सरपंच गजानन ढोरे, संतोष वाघधरे, सरपंच नरेंद्र राखडे, गंगाधर राऊत, अमरदिप राखडे, दिवारू कुंभारे हे उपस्थित होते.