खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी, दि. १६ :
अल्पवयीन मुलीशी बळजबरीने अश्लील चाळे करुन तिचे अश्लील फोटो प्रसारमाध्यमांवर प्रसारीत केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदीप धनराज गराडे ( २६), शेरू मुस्तफा शेख (२५) रा. गांधीनगर असे आरोपींची नावे आहेत.
यातील पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार यातील आरोपी शेरु शेख याच्यासोबत मैत्री होती. मैत्रीचा गैरफायदा घेत शेरू याने पीडितेच्या मैत्रिणीच्या घरी येऊन व तिच्या मैत्रिणीला घराबाहेर पाठवून दोघांच्याही अंगावरील कपडे काढून पिडीतेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने यास नकार दिला. यावेळी आरोपी शेख याने ही गोष्ट कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
दुसऱ्या प्रकरणात शेरू शेख याचा मित्र संदीप गराडे याचे सोबत पिडीतेची सप्टेंबर - आक्टोबर महिन्यात मैत्री झाली होती. त्यावेळी यातील आरोपी संदीप हा पीडितेला बाहेर फिरायला नेत असे. येथील खेड मकता रोडवरील शासकीय गोडाऊन जवळ घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने तीचेशी अश्लील चाळे करत तिच्या व आपल्या अंगावरील संपूर्ण कपडे काढत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिडीतेने नकार दिला. यावेळी आरोपीने अश्लील फोटो काढले होते. ही घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी पीडितेला दिली.
दिनांक १४/८/२०२० ला पीडितेच्या मावशीच्या घराजवळ तिची मैत्रीण येऊन तिचे फोटो वायरल झाल्याचे सांगितले. शहानिशा केली असता त्यावेळेचे फोटो एका अल्पवयीन आरोपीने मैत्रिणीच्या व्हॉटसअपवर टाकल्याचे दिसून आल्याची फिर्याद पीडितेने दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शेरू शेख व संदीप गराडे या दोन आरोपींना कलम ३७६(१) ३७६(३), ५००, ५०६ सहाकलंम ६६(ई) ६७(जी) ४,८ अन्वये अटक केली आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.