ब्रम्हपुरी तालुक्यातील त्या बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी तालुक्यातील त्या बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला #bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

ब्रम्हपुरी जवळील लखापुर येथील शेतकरी प्रेमदास जगणं शंभरकर (वय 58) हा नेहमीप्रमाणे सायकलने सायगाटा येथील आपल्या शेतावर गेला होता. शेतावर काम केल्यानंतर सायगटा येथील एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेला. तिथे चहा पिऊन झाल्यावर त्या चहा दुकान  चालकास लाखपुरकडे जाणारा मार्ग विचारला. 

परंतु दुकान चालकास असे वाटले की, रोजची व्यक्ती असल्याने आपली गम्मत करीत असल्याचे त्यास वाटले.परंतु सायंकाळी प्रेममदास घरी न परतल्याने गावकऱ्यांनी रात्रभर वाघाने मारले असेल म्हणून पूर्ण जंगल परिसर पिंजून काढला. 


परंतु तो न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी दि. 5 लां प्रेमदास बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मोठे बंधू जनार्धन शंभरकर यांनी पोलिस स्टेशन इथे करण्यात आली. त्या दिवसापासून सर्वत्र शोध घेण्यात येत होता. परंतु आज दि. 11 तुमडीमेंढा येथील शेतकरी शेतकरी जाण्यास निघाले असता गावाजवळील तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 


याची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष यांना कळविले. ही माहिती लाखापुर वासियांना कळविण्यात आली. त्यावेळी मृतकाच्या मुलाने शहानिशा करण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. सदर मृतदेह आपल्या वडीलाचेच असल्याचे सांगितले. याची माहिती पोलिस ठाणे ब्रम्हपुरी येथे देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उंदीर वाडे करीत आहेत.