चाळीस हजार लोकसंख्येच्या शहरात एकही स्वर्गरथ गेली दोन वार्षपासून उपलब्ध नाही .त्यासाठी नागभीड वर अवलंबून राहावे लागत असल्याने येथे मरण महाग झाले आहे. दोन कुचजमी स्वर्गरथा पैकी एक मालवाहक झाले आहे तर दुसरा अळगळीत पडला आहे.
ब्रम्हपुरी शहराची व्याप्ती वाढलेली आहे. अंतिम सोपस्कार करण्याचे ठिकाण आता दूर होऊ लागल्याने अंतीमसंस्कारासाठी स्वर्गरथ आवश्यक झाले आहे. यापूर्वी ब्रम्हपुरीत एका आमदारांनी गरज लक्षात घेऊन स्वर्गरथ बहाल केला होता. परंतु काही दिवस व्यवस्थित उपयोगात आला कालांतराने त्यात बिघाड झाले आज त्याची दुरुस्ती करून ते मालवाहक बनले आहे .तर दुसऱ्या आमदारांनी दिलेले स्वर्गरथ आज भंगार अवस्थेत पडले आहे.
नगरपरिषदेने या बाबीची पूर्तता करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे पण या कडे नगरपरिषदने अजूनही मनावर घेतले नाही असे दिसून येते आहे. अश्या संकटाच्या काळात नगरपरिषदेने पुढाकार घेऊन शोकाकुल कुटुंबास आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु वडसा अथवा नागभीडचे स्वर्गरथ येऊन सहारा देण्याचे कार्य अजून किती दिवस चालणार आहे.
हे सांगता न येण्यासारखे आहे काही प्रभाग साठी अंतीमसंस्कार ठिकाण तीन ते चार किमी ईतके लांब आहे अश्यावेळी स्वर्गरथ सहज उपलब्ध झाले नाही तर शोकाकुल कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडत असल्याने जिवंतपणी मरणासोबत यातना भोगाव्या लागत असल्याचे काहींनी बोलून दाखवले आहे.हि अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद किंवा काही सामाजिक संघटनानि समोर येण्याची खरी गरज आहे.
प्रतिक्रिया - रिता दीपक उराडे, नगराध्यक्ष, ब्रम्हपुरी.
" कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व कामे ठप्प झाले आहे. स्वर्गरथ उपलब्ध करून देण्या संदर्भात आपण भूमिका घेतली आहे. ब्रम्हपुरीकरांची हि समस्या लवकरच पूर्ण करू त्यासाठी थोडा वेळ लागेल "