विहीरगांव वाचनालयाला स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ पुस्तकांची भेट #books donated to library - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विहीरगांव वाचनालयाला स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ पुस्तकांची भेट #books donated to library

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -विहीरगांव:-

वाचनालय सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय.यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी मुले वाचनालयात जातात. 


अशेच वाचनालय राजुरा तालुक्यातील ग्रा.पं.विहीरगांव येथे आहे. गांवातील मुलांना शिक्षणांची गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात पुस्तकांच्या मध्यामातून परिवर्तन घडून यावं यासाठी श्रीहरी साळवे.यांनी आपल्या आई स्व.राधाबाई सखाराम साळवे यांच्या स्मृति दिनाप्रित्यार्थ आज दिनांक १९/०८/२०२० रोजी विहीरगांव येथील सार्वजनिक वाचनालयाला पुस्तकांची भेट दिली आहे. 


यावेळेस उपस्थितीमध्ये श्रीहरी साळवे सर, वामन साळवे सर गावंचे उपसरपंच ईशादजी शेख, आशिष मोहुलै, मयूर वांढरे, दिपक खेडेकर, क्रिष्णा प्रधान, संकेत वांढरे उपस्थित होते. या पुस्तकाच्या भेटीमुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 


🔰⭕️🎯 सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये व वाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या