रानडुक्कराचे दात व वाघाच्या मिशा जप्त गुप्तधनासाठी वापर केला जात असल्याची शक्यता - तिघांना अटक #boars-teeth-and-tigers-mustache-seized - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रानडुक्कराचे दात व वाघाच्या मिशा जप्त गुप्तधनासाठी वापर केला जात असल्याची शक्यता - तिघांना अटक #boars-teeth-and-tigers-mustache-seized

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : चिमूर -नेरी


रानडुक्कराचे दात व वाघाच्या मिशा घेऊन जाणार्‍या तिघांना वनाधिकार्‍यांनी अटक केली. वन्यप्राण्यांचे हे अवयव गुप्तधनासाठी वापरले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.राजू पिल्लेवार(45), दिलीप पिल्लेवार(55, रा. उसेगाव) व कोलारी बालाजी सिडाम असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तीन आरोपी नेरी येथून एका दुचाकीने वन्यप्राण्यांचे अवयव घेऊन जात असल्याची माहिती चिमूर वनाधिकार्‍यांना मिळाली. माहिती मिळताच सापळा रचून आरोपींची दुचाकी अडवली. त्यांची चौकशी केली असता, त्यात रानडुक्कराचे दात व वाघाच्या मिशा आढळून आल्या. त्यांना लागलीच ताब्यात घेऊन चिमूर वनविभागाच्या कार्यालयात आणले. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, ते गुप्तधनासाठी वन्यप्राण्यांच्या अवयवाचा वापर करणार होते, अशी चर्चा आहे. आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.