🩸लाठी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन असंख्य युवकांनी केले रक्तदान #blooddonation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

🩸लाठी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन असंख्य युवकांनी केले रक्तदान #blooddonation

Share This

खबरकट्टा / यवतमाळ : लाठी : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रहीताच्या दृष्टीने युवा बाल गणेश मंडळ लाठी तर्फे दिनांक २५ ऑगस्ट रोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय रक्तपेढी चंद्रपूर च्या साहाय्याने रक्तदान शिबिर लाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन लाठी येथील युवक राहुल खारकर,प्रभाकर वाघाडे,प्रमोद खिरटकर, निलेश करडे,ज्ञानेश्वर गोवरदिपे यांनी केले होते.या शिबीराकरीता चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीतून संजय गावीत समाजसेवा अधिक्षक,जयसिंग डोंगरे प्रयोगशाळा तंत्रन्य,वर्षा सोनटक्के प्रयोगशाळा तंत्रन्य,अपर्णा रामटेके प्रयोगशाळा तंत्रन्य,लक्ष्मण नगराळे परिचर,रुपेश घुमे इत्यादी आले होते.


यात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कोरोनामुळे चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी झाल्याचा लक्षात येता ही सदर रक्तपेढी सशक्त व्हावी या उद्धात हेतूने रक्तदान करण्यात आले. 


तसेच रक्तदान शिबिरात ज्या महिला रक्तदान करणार त्या महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात येणार होता यात गावातील महिला संजीवनी खिरटकर,सुनीता डवरे,अश्विनी गोवारदिपे,राणी गोवारदिपे,राधा गोवारदिपे,मीनाक्षी उराडे, हर्षाली खोके यांनी सहभाग नोंदवला असता काही स्वास्थ्य संबंधी अडचणीमुळे यांना रक्तदान करता आले नाही.


या रक्तदान शिबिरात अनेक गावातील तथा आजू बाजूच्या  गावातील युवकांनी रक्तदान केले ज्यामध्ये धर्मा डोहे, रमेश खिरटकर,रितेशभाऊ लाडे,धीरज भोयर,राहुल परचाके,प्रमोद खुरसाने,राकेश वराटे, मनोज आंबाडे,दीपक नरवडे,आशिष माहुरे,मंगेश मोते,सचिन खिरटकर,गणेश माहुरे,गणेश आंबडे,दीपक मोते, सचिन सातपुते,दिलीप खोके,संदीप राजूरकर,सुभाष मोते,आशिष खारकर,प्रेमा किटे,प्रफुल उपरे, प्रवीण मोते,आशिष घोरुडे,विजय गोवारदिपे अशा असंख्य युवकांनी रक्तदान केले.


या रक्तदान शिबिराकरिता यशस्वितेकरिता लोकेश खोके,अजय गोवारदीपे,मुकेश खिरटकर,प्रकाश चार्लीकर,मंगेश खोके,निखिल तोडासे,कपिल खोके यासह गावकऱ्यांनी योगदान दिले.