शुल्लक कारणावरून कासनगोट्टुवरांचा राग अनावर : वयोवृद्ध व्यक्तीला अश्लील शिवीगाळ, गेले अंगावर धावून : दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार : नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना नागरिकांशी कसे बोलायचे कोचिंग घेण्याची गरज #bjp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शुल्लक कारणावरून कासनगोट्टुवरांचा राग अनावर : वयोवृद्ध व्यक्तीला अश्लील शिवीगाळ, गेले अंगावर धावून : दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार : नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना नागरिकांशी कसे बोलायचे कोचिंग घेण्याची गरज #bjp

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर – 

चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात एक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे बांधकाम अजूनही सुरू नाही. पावसाळा सुरु असून कच्च्या रोड वर होत असलेले चिखलाने नागरिक त्रस्त आहेत. या रस्त्याच्या बांधकामाबाबत तुकुम प्रभाग 1 मधील नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार यांना वयोवृद्ध नागरिक  बाबुराव झाडे यांनी साधी विचारणा केली असता भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी अश्लील शिवीगाळ करीत मारण्यासाठी त्या नागरिकांच्या अंगावर धावून गेले. 

या प्रकारची तक्रार झाडे यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला दिली.त्यांच्या तक्रारी नुसार तुकुम प्रभागातील 68 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी बाबुराव झाडे यांच्या घरासमोरील सिमेंट रोड 1 वर्षाआधी मंजूर झाला असल्याने त्याचे काम सुरू झाले नाही, मात्र त्यानंतर च्या मंजूर झालेल्या रस्त्याचे काम सुद्धा सुरू झाले.

आमच्या घराजवळील रस्त्याचे काम सुरू करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी विचारणा भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांना केली असता त्यांनी मला अश्लील शब्दात शिवीगाळ करीत मला मारण्यासाठी माझ्या अंगावर धावून आले, असा आरोप झाडे यांनी केला आहे.वाद इतका वाढला की नागरिकांना दोघांत मध्यस्ती करावी लागली.

शहरातील भाजपचे गणमान्य नगरसेवक म्हणून गणले जाणारे कसनगोट्टूवार यांच्या प्रभागातच नेहमीच नागरिकांसोबत वादविवाद समोर येत आहेत.लहानसहान बाबींवरून राग अनावर होत नागरिकांना त्रासाला समोर जावे लागतेय. या महाशयांची अरेरावी वाढत चालली असल्याची प्रतिक्रिया तुकूम प्रभाग 1मधील नागरिकांनी दिली.