पब्जी च्या नादात तरुणाचा गळफास #Ban PUBG - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पब्जी च्या नादात तरुणाचा गळफास #Ban PUBG

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी वार्ड क्रमांक 6 येथील गौरव पाटेकर (वय -19) नामक युवकांने पब्जी या गेम च्या नैराश्यातून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याने गळफास घेण्यापूर्वी आपल्या मित्राला मी जात आहो असे म्हणत फोन ठेवला, मित्राने तात्काळ गौरवच्या मोठ्या भावाला फोन करून माहिती दिली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.गौरव आपल्या रूम मध्ये फासावर लटकत होता.

या घटनेने माजरी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलाच्या मृत्यूने पाटेकर परिवारात दुःख कोसळले.आसपासच्या पालकवर्गात पब्जी या मोबाईल गेम मुळे चिंता वाढली आहे. 


सध्या देशात युवक वर्गात पब्जी या गेमचे व्यसन जडले आहे, या गेम मध्ये टास्क पूर्ण न झाल्याने युवक वर्ग वारंवार गेम सुरू करून कोणतेही लक्ष न वगळता या गेमच्या आत स्वतःला झोकून देत असतो, कधीकधी तर युवक एकट्या मध्ये जोराने ओरडायला लागतो.

गौरव पाटेकर नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयात बी.कॉम मधील पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. देशात कोरोना लॉकडाऊन करण्यात आले त्यावेळीरव हा आपल्या स्वगावी माजरी मध्ये आला,अभ्यासात हुशार गौरव ला अचानक मागील 5 महिन्यापासून पब्जी गेम चे व्यसन जडले होते.या व्यसनाने त्याला जेवणाची सुद्धा भान राहत नव्हते.

गौरवच्या नातेवाईकांच्या सांगण्या नुसार त्याला पब्जी गेमचा खूप छंद लागला होता, तो नेहमी एकांतात हा गेम खेळत होता, वारंवार घरच्या लोकांनी त्याला समजवायचा प्रयत्न सुद्धा केला परंतु हा छंद त्याचा जीव घेणार याची कुठलीही कल्पना घरच्या सदस्यांना नव्हती.