निवृत्तीच्या तीन दिवसापूर्वीच कर्मचारी बेपत्ता #ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निवृत्तीच्या तीन दिवसापूर्वीच कर्मचारी बेपत्ता #ballarpur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -


बल्लारपूर शहरातील डॉ राजेंद्रप्रसाद वॉर्ड येथील निवासी
असलेले व नगर परिषद बल्लारपूर  येथे कर विभागात कार्यरत असलेले दामोधर गोपाळ रत्नपारखी हे दि. २८ जुलै २०२० पासून बेपत्ता झाले आहे. निवृत्तीच्या तिन दिवसापूर्वी पासून ते बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा युध्द पातळीवर शोध घेत आहे.

विशेष बाब म्हणजे दामोधर रत्नपारखी आपल्या वयाची ६० वर्षपूर्ण करून याच महिन्याच्या शेवटी ३१ जुलै २०२० ला नगर परिषद च्या कार्यातून निवृत्त होणार होते.मात्र त्यापूर्वीच ते घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात पोलीस स्टेशनबल्लारपूर येथे तक्रार दाखल
करण्यात आली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीतआहे.तसेच ज्या कुणाला दामोधर रत्नपारखी कुठेही आढळून 
आल्यास त्याची संपूर्ण माहिती  विशाल रत्नपारखी यांना देण्यात यावे असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.