नागभीड पंसच्या माजी सभापती सह सरपंचावर ॲट्रॉसिटी : नागभीड पंचायत समीतीच्या माजी सभापती व मिंथूर सरपंच विरोधात अँट्रासिटी गुन्हा दाखल. (उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांनी केली कारवाई #atrocity - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नागभीड पंसच्या माजी सभापती सह सरपंचावर ॲट्रॉसिटी : नागभीड पंचायत समीतीच्या माजी सभापती व मिंथूर सरपंच विरोधात अँट्रासिटी गुन्हा दाखल. (उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांनी केली कारवाई #atrocity

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
नागभीड पंचायत समीतीच्या माजी सभापती प्रणया गणेश गड्डमवार वय ४० वर्षे रा. मिंडाळा यांच्या वर १४ जुलैला अविश्वास प्रस्ताव पारीत केल्याने त्याच्या वचपा काढण्याचा उदेशाने तळोधी पंचायत समीतीच्या सदस्या सौ. रंजना वासुदेव पेंदाम यांच्या घरी ११ आँगस्ट दिवशी दुपारच्या दरम्यान चारचाकी वाहनाने येवून अश्लील शब्दांत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. 

या तक्रारी वरुन पोलिस उपविभागीय अधिकारी मिंलिद शिंदे व तळोधी पोलिस स्टेशन चे ठाणेदार रोशन शिरसाठ यांनी गोवर्धन वार्ड येथील घटनास्थळी येवून पंचनामा करुन माजी सभापती प्रणया गड्डमवार वय ४० वर्षे व मिंथूरचे सरपंच नंदकिशोर पत्रूजी करकाडे वय ३८ यांचा विरोधात तळोधी बा.पोलिस स्टेशन येथे अपराध क्र.२०७/२० अंतर्गत अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम १९८९ च्या अंतर्गत ३(१)r, 3(१)s, ३(२)va व कलम २९४, ३४, ५०४, ५०६ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी सभापती प्रणया गड्डमवार यांची प्रतिक्रिया : 

" मी माझे ऊसनवार दिलेले पैसे मागायला गेली, ऊलट पैसे परत न करता मलाच फसविन्याची धमकी दिली. तसी तक्रार मी आधिच 11 आगष्ट ला पो.स्टेशन तळोधी(बा.) येथे केलेली आहे. माझ्यातर्फे असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. माझ्या सोबत सौ.शर्मिला रतन रामटेके ही उपस्थित होत्या.माझ्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे."