शेतक-याचे प्रश्न तात्काळ सोडवा -आम आदमी पार्टी ची मागणी #AAP - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतक-याचे प्रश्न तात्काळ सोडवा -आम आदमी पार्टी ची मागणी #AAP

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपुर जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असताना शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यावे तसेच दुबार पेरणी करणा-या शेतक-याना आर्थिक मदत देण्यात यावी ही मागणी घेवून आम आदमी पाटी चंद्रपुर जिल्हा तथा महानगर च्या नेतृत्वात जिल्हाधीकारी कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आली वरील शेतक-याचे मागण्यांचे निवेदन मा .जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.ऊद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री याना देण्यात आले.

शेतकयांना त्वरित पीककर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँका तसेच सहकारी बॅका टाळाटाळ करीत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, निकृष्ट बियाणे विकणा-या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे या मागण्यासह शेतक-याच्या अन्य मागण्या घेऊन आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली

शेतकऱ्यांच्या समस्या त्वरीत सोडवाव्या अन्यथा चंद्रपुर जिल्ह्यातील संपुर्ण शेतक-याना सोबत घेऊन आंदोलन तिव्र करण्यात येईल असा ईशारा आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे तसेच महानगर अध्यक्ष अॅड.राजेश विराणी यानी दिला आहे. 

या वेळी आम आदमी पार्टी चे सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश विराणी महानगर अध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष सुनील भोयर महानगर उपाध्यक्ष योगेश आपटे महानगर उपाध्यक्ष राजेश चेडगुलवार सोशल मीडिया प्रमुख, अशोक आनंदे, शाहरूख शेख , दिलीप तेलंग , संदिप पिंपळकर, अजय डुकरे पदाधिकारी तथा बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.