चंद्रपूर 856: महिला रुग्णाचा कोरोनाने मृत्यू : आज 23 नवे बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर 856: महिला रुग्णाचा कोरोनाने मृत्यू : आज 23 नवे बाधित #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 23 बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या 856 झाली आहे. आतापर्यंत 475 बाधित बरे झाले आहे. तर 375 बाधितावर उपचार सुरू आहे.


आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. यामध्ये 50 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला व दोन वर्षीय मुलाचा समावेश आहे. याशिवाय पोलीस लाईन बिल्डिंग तुकुम येथीलच एक 22 वर्षीय युवक कोरोना सदृष्य आजाराचे लक्षण असल्याने तपासणीत पॉझिटिव्ह आला आहे.


दत्तनगर नागपूर रोड सिव्हिल लाईन येथील 21 व 22 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुर्गापुर वार्ड नंबर 2 येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथील 31 व 30 वर्षीय पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहे. हिंदुस्तान कॉलनी लालपेठ वॉर्ड येथील 30 पुरुष व 44 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे.


पोलीस लाईन येथील 15 वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. जटपुरा गेट येथील 38 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. रामनगर शुभमंगल कार्यालयाजवळील 27 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. पोलीस लाईन तुकूम येथील 55 वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प येथील 21 वर्षीय व 58 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरले आहे. याशिवाय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेली 30 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.


याशिवाय जिल्ह्यातील वाडेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, घुग्घुस चंद्रपुर येथील 56 वर्षे पुरुष आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील भांडेगाव येथील 25 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. असे आजचे एकूण 23 पॉझिटिव्ह पकडून 856 बाधित आतापर्यंत पुढे आले आहे.