74 व्या स्वातंत्र्यता दिनानिमीत्त गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार #suraj_peddulwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

74 व्या स्वातंत्र्यता दिनानिमीत्त गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार #suraj_peddulwar

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : 

15 ॲागस्ट स्वतंत्रता दिनाच औचित्य साधुन  आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात सुरज पेदुलवार यांच्या नेतृत्वात अर्पण संस्थेद्वारा भानापेठ प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रम प्रभागात तिन ठिकाणी घेण्यात आले.


स्वातंत्र्य लढ्यात अनेक लोकांनी बलिदान दिले.त्यांच्या बलिदानाच फलरूप हे आजच स्वातंत्र्य आहे .युवा पिढी ने ही गोष्ट विसरतां कामा नये. अश्या थोर पुरूषांना नमन केलं पाहिजे.आमचे मार्गदर्शक नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार  नेहमी सांगतात ”देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, बहता रहे ये पुरे साल ”.

त्यामुळे फक्त 15 ॲागस्ट असो की 26 जानेवारी या दोन दिवसांपर्यंत देशप्रेम मर्यादीत राहु नये.एखाद्याने चांगल काम केलं की त्याला शाबासकी चा हात दिला की त्यांना  अजुन उर्जा मिळते. इयत्ता 10 वीच्या ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे किंवा काही विद्यार्थी करू शकले नसतील अश्या प्रभागातील सर्व विद्यार्थानी 2 वर्षांनी इयत्ता 12 वी मध्ये प्राविण्य प्राप्त कराव.यांच ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा घेऊ अशी अपेक्षा विद्यार्थांकडे सुरज पेदुलवार यांनी बोलतांना व्यक्त केली.

यावेळेस महेश वासलवार , संदिप कुकडपवार, महेश अडगुरवार यांची विशेष  उपस्थिती होती तर सचिन पांढरे , नितीन टहलियानी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण उरकुडे , प्रलय लेदे,रूपेश लेदे , मयुर पाटील , शशांक काकडे , सुनिल मिलाल ,साजिद पठाण ,भूषण पाटील ,आदित्य अडगुरवार , निनाद झुलकंठीवार, ओम अडगुरवार , भावेश जाधव ,विष्णु  क्षीरसागर इत्यादींनी परिश्रम घेतले.