कोरोना मृत्यू सहावा : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा 6 वा बळी : आज 46 नवे रुग्ण #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना मृत्यू सहावा : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा 6 वा बळी : आज 46 नवे रुग्ण #covid-19

Share This

 खबरकट्टा / चंद्रपूऱ दि. 12 ऑगस्ट (जिला माहिती कार्यालय) : 

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये  आज 6 वाजे पर्यन्त नवीन 46  रुग्ण पुढे आले आहे. 375 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 561  बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत.

     

काल रात्री सात वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 26 रुग्ण पुढे आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातिल 6 नागरिकांचा  मृत्यु झाले आहे आणि 2 मृत्यु जिल्ह्य बाहेरिल नागरिक 1 तेलंगाना आणि 1 बुलढाणा.


जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक असून चंद्रपूर जिल्ह्यात संपर्कातील बाधिताची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये

 चंद्रपूर जिल्ह्यातिल नागरिकांनी शारीरिक अंतर राखावे, कोरोना आजाराला गृहीत धरू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पुन्हा पुन्हा चंद्रपूर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.