चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळ असलेल्या साठगाव येथे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता घडली.
सविस्तर माहिती नुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथून झायलो MH 03 BS 7502 या चार चाकी वाहनाने विदेशी दारू ब्रह्मपुरी येथे नेण्यात येत होती.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने साठगाव येथील उभ्या दुचाकीला धडक देत वाहन बसस्थानक जवळील चहा टपरीमध्ये घुसले. ही टपरी बंद असल्याने जीवित हानी टळली.
ही बाब गावकऱ्यांना माहीत होताच तेथे एकच गर्दी झाली वाहन हे महिला चालवीत होती. गावकऱ्यांनी अधिक चौकशी केली असता त्या वाहनात विदेशी दारूच्या पेट्या आढळल्या. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या वाहनात २४ हजार रुपये किमतीच्या ८० विदेशी दारूचा साठा व सहा लाख रुपये किमतीची झायलो वाहन असे एकूण सहा लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सामील व्हा : खबरकट्टा च्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये
आरोपी राहुल मैन्द व चालक प्रतिभा मैन्द या पती, पत्नी वर गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई शंकरपुर चौकीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विनाेद जांभळे, पोहे काॅ. रंगराव खोबरागडे, पोशि मंगेश बनसोड, पोशि अमित उरकुडे यांनी केली.