हे आहेत सुरज बहुरिया हत्याकांडातील 5 मुख्य आरोपी : सुरज बहुरियाला श्रद्धांजली देण्याकरिता चाहत्यांचा लोटला सागर #suraj bahuriya mruder case ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हे आहेत सुरज बहुरिया हत्याकांडातील 5 मुख्य आरोपी : सुरज बहुरियाला श्रद्धांजली देण्याकरिता चाहत्यांचा लोटला सागर #suraj bahuriya mruder case ballarpur

Share This
खबरकट्टा / चंद्द्पूर : बल्लारपूर - 

काल बल्लारपूर शहरात दिवसाढवळ्या, भर चौकात वर्चस्वाच्या लढाईत अवैध धंद्यातून खुनाची धक्कादायक घटना घडली.


बल्लारपुरात मागील दोन महिन्यापूर्वी एका सुरक्षा एजन्सी च्या मालकाने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या असल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा युवक काँग्रेस चा तथाकथित सदस्य सूरज बहुरीया यांची भर दिवसा तब्बल सहा गोळ्या झाडून निर्घुन हत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 


या घटनेमुळे बल्लारपूर शहरात तणावाचे वातावरण असून अवैध कोळसा चोरी व अवैध दारू विक्रीतून मोठे झालेल्या दोन तस्करांच्या वर्चस्वाच्या लढाईत शेवटी अवैध दारू विक्री करणाऱ्या अमन अंडेवार गैंग ने अवैध कोळसा व दारू तस्करीत लिप्त सूरज बहुरीया चा खून केल्याने बल्लारपूर शहर पुन्हा आपली जुनी ओळख निर्माण करतोय की काय अशी भीती बल्लारपूर शहरातील जनतेत निर्माण झाली आहे. 

महत्वाची बाब म्हणजे खून करणाऱ्या अमन अंडेवार याचा कालच 8 ऑगस्ट आज वाढदिवस होता आणि त्यांनी तीन दिवसापूर्वी आपल्या व्हाट्सअप्प स्टेटस वर ” जंगल जंगल ही रहेगा मगर शेर बदल जाएगा” असा अगोदरच अगाज केला होता हे विशेष. 9 ऑगस्ट सुरज बहुरिया चा वाढदिवस असायचा, कालच बल्लारपूर शहरात सर्वत्र त्याच्या वाढदिवसाचे फलक झळकत असताना अचानक गोळीबारात झालेला मृत्यू त्याच्या अनेक सहकार्यांना धक्कादायक ठरला. 

ग्यांगवॉर च्या या प्रकरणात वर्चस्वाची लढाई व एक दुसऱ्यांची दुष्मनी हेच या घटनेचे प्रमुख कारण असल्याचे बोलल्या जात आहे. खून करणाऱ्या अमन अण्डेवार याचा काल वाढदिवस होता व म्रूतक सूरज बहुरीया याचा आज वाढदिवस आहे. 


हे दोन्ही प्रतिस्पर्धी दरवर्षी वाढदिवसाला मोठे शक्ती प्रदर्शन करीत होते आणि वाढदिवसाला लाखो रुपयाची उधळण करायचे मात्र या वाढदिवसाला ग्रहण लागून एका गैंग चा अंत झाला तर दुसऱ्या गैंग ची कारागृहात रवानगी होईल त्यामुळे बल्लारपूर शहरात दोन्ही गैंग चा अस्त आता झाल्याचे बोलल्या जात आहे. 


अमन ऊर्फ अमर आनंद अंदेवार (29),प्रणय राजू सैगल (22), अविनाश उमाशंकर बोबडे (22), बंटी ऊर्फ आल्फ्रेड लॉजीटस अँथोनी(19),बादल वसंत हरणे (19) या पाच गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज बहुरीया यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याने शवविच्छेदनाअंती आज शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान सुरज बहुरियाला अंतिम श्रद्धांजली देण्याकरिता वेकोलि गेट परिसरात हजारो नागरिक जमा झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 
पुढील तपास डॉ.महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, स्वप्नील जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर करीत आहे.