ब्रेकिंग : जिल्ह्यातील 5 व्या कोरोना बाधिताचा मृत्यू :बल्लारपूर येथील ज्येष्ठ नागरिकाचे कोरोनामुळे निधन #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : जिल्ह्यातील 5 व्या कोरोना बाधिताचा मृत्यू :बल्लारपूर येथील ज्येष्ठ नागरिकाचे कोरोनामुळे निधन #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचे आज कोरोनामुळे सकाळी ११ वाजता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. आल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती.



जिल्हयातील रहिवासी असणाऱ्या पैकी हा कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू . आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयातील पाच वगळता अन्य दोन मृत्यूमध्ये तेलगांना राज्य व बुलडाणा जिल्हयातील प्रत्येकी एकाचा सहभाग आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ८९८ बाधिताची नोंद झाली आहे.