कोरोना विस्फोट : विक्रमी नवे 57 रुग्ण आज समोर : एकूण संख्या 682 #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना विस्फोट : विक्रमी नवे 57 रुग्ण आज समोर : एकूण संख्या 682 #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 05 ऑगस्ट : 

जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक 57 बाधिताची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात मोठ्याप्रमाणात रुग्ण पुढे आल्यामुळे काल सायंकाळी 625 असणारी बाधितांची संख्या आज 682 वर पोहोचली आहे. यापैकी 406 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 276 बाधितावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहर व लगतचा परिसर मिळून 23, बल्लारपूर शहर व विसापूर गाव मिळून एकूण 8, भद्रावती 7, वरोरा 5, राजुरा 2 , कोरपना 2, ब्रह्मपुरी 4, नागभीड 5 व नागपूर जिल्यािळचा रहिवासी असणारा एक असे एकूण 57 बाधित पुढे आले आहेत.
चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने सापडलेल्या 23 रूग्णांमध्ये अँन्टीजेन टेस्टमध्ये बिहार येथून आलेल्या सात कामगारांचा समावेश आहे. हे सर्व पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून शहरात मोठ्या प्रमाणात संपर्कातून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राजस्थान, तेलंगाना, उत्तर प्रदेश या भागातून प्रवास करून आलेले नागरिक, याशिवाय मुंबई व पुणे या शहरांमधून आलेल्या नागरिकांची बाधितांमध्ये अधिक नोंद आहे.

बल्लारपूर येथील शहर व विसापूर गाव मिळून 8 रुग्ण पुढे आले आहेत. यामध्ये श्वसनाचा आजार असणारा केवळ एक रुग्ण आहे. एक रुग्ण हैदराबाद वरून आलेला आहे. अन्य 7 आधीच्या पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी वाढवण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांना देखील स्वतःहून चाचणी करण्यासाठी चंद्रपूर शहरांमध्ये पाण्याच्या टाकीजवळ सरदार वल्लभाई पटेल विद्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात सुरु करण्यात आलेल्या अँन्टीजेन चाचणीची संख्या बुधवारपर्यंत 9 हजारावर होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पुढील काही दिवसात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली असून आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 5 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत आलेली 670 बाधितांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 65, बल्लारपूर 11, पोंभूर्णा 9, सिंदेवाही 14, मुल 13, ब्रह्मपुरी 51, नागभीड 56, वरोरा 13, कोरपना 35, गोंडपिपरी तीन, राजुरा 8, चिमूर 18, भद्रावती 7, जिवती, सावली येथे प्रत्येकी 2 बाधित आहेत.

शहरी भागामध्ये बल्लारपूर 45, वरोरा 27, राजुरा 12, मुल 39, भद्रावती 45, ब्रह्मपुरी 24 बाधित आहेत.