थरार ! तो वृद्ध वाघाच्या तावडीतून कसाबसा सुटला : आज दुपारी 4 वाजताची घटना #wild attack lift - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थरार ! तो वृद्ध वाघाच्या तावडीतून कसाबसा सुटला : आज दुपारी 4 वाजताची घटना #wild attack lift

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -


सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील एका शेतकर्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली.सविस्तर वृत असे की, पवनपार परीसरात आता शेतीची कामे मोठ्या जोमाने सुरू आहेत. काम झाल्यावर दुपारच्या वेळी शेतकरी आपली गुरे शेताजवळ असलेल्या खाली जागेत चरायला नेत असतात. आज असेच शेतकरी आपली शेतीचे कामे करून बैल चारत असतांना अचानक दबा धरलेल्या वाघाने गोकुळ ऋशी निकुरे (वय 60वर्षे) या शेतक-यावर हल्ला केला. यात शेतकरी जखमी झाला परंतु निकुरे यांनी घाबरून न जाता प्रतिवार करण्याचा प्रयत्न केला. या आवाजाने काही अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांनी निकुरे यांच्या दिशेने धाव घेतली.

त्यांनी आरडा ओरड केल्याने वाघाने पोबारा केला आणि शेतकरी गोकुळ निकुरे यांचा जीव वाचला.ही घटना कम्पारमेन्ट नं २८२ खोदतलावजवळ घडली. अचानक याच रस्त्याने जंगल गस्त करून येत असतांना एस के येरमे वनरक्षक ही घटना पाहिली. वनरक्षकांनी लगेच जखमीला गुंजेवाही येथील प्राथमिक केंद्रामध्ये उपचारा करीता पाठवन्यात आले .