राजकीय ब्रेकिंग : गोंडपिपरी माजी नगराध्यक्षासहित भाजपचे 4 नगरसेवक अपात्र : #gondpipari - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजकीय ब्रेकिंग : गोंडपिपरी माजी नगराध्यक्षासहित भाजपचे 4 नगरसेवक अपात्र : #gondpipari

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात 

जात पडताळणी प्रमाणपत्र वेळे सादर न करू शकल्याच्या च्या कारणावरून नगरपंचायत गोंडपिपरी येथील चार नगरसेवक अपात्र घोषित करण्यात आले आहे. यात  माजी नगराध्यक्षा चा सुद्धा समावेश असल्याचे कळते. सर्व नगरसेवक भाजपचे आहेत.


गोंडपिपरी नगर पंचायत सदस्य श्री संजय दादाजी झाडे,  जितेंद्र ईटेकर ,सरिता पुणेकर ,किरण नगारे यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 9-अचे उल्लंघन केल्याने त्यांचे नगर पंचायत सदस्यत्व याद्वारे रह (निरर्ह) ठरविण्यात आले आहे.


सदर आदेशाचा इ-मेल आज सकाळी गोंडपिपरी नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त होताच राजुरा विधानसभेतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवाय गोंडपिपरी नगरपंचायतीचा पंचवार्षिक कालावधी संपायला अवघे 6 महिने बाकी आहेत हे विशेष. 

सर्वसविस्तर वृत्त काही वेळात....