मागील 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुग्घुस नगरपरिषदेचा प्रस्ताव मंजूर झाला असून नगरपरिषदेची अधिसूचना जाहीर झाल्याची माहिती पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांनी आज चंद्रपूर दौऱ्यावर असताना दिली.
चंद्रपुर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घूस शहरातील ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्याकरिता मागील 27 वर्षा पासून घुग्घूसकर जनता लढा देत आहे.
2011 च्या जनगणने नुसार 32654 इतकी लोकसंख्या असून आजघडिला ती 50000 च्या वर गेलेली असून वार्षिक उतपन्न 8 ते 10 कोटींच्या घरात आहे.मात्र अजुन पर्यंत घुग्घूस ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला नव्हता.
याच अनुषंगाने घुग्घूस नगरपरिशद लवकरात लवकर व्हावी याकरिता दिनांक 29 जानेवरी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या सह आमदार किशोर जोरगेवार , राजुरेड्डी घुग्घूस शहर अध्यक्ष यानी ग्रामविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना सविस्तर माहिती देवून घुग्घूस नगरपरीषद् लवकरात लवकर घोषित करण्याची मागणी केली होती.